हर्षाचे हे मेघ मनी...
हर्षाचे हे मेघ मनी...
हर्षाचे हे मेघ मनी..
वाट भरकटुनी आले..
त्याचमुळे हे दुःख डोळी..
जणू धुके बनुनी दाटले..
सप्तरंगी विचार माझ्या..
मस्तकी शिरून आले..
मेघवर्षावानंतर आकाशी जणू...
इंद्रधनूच रेखाटले..
मेघवर्षाच्या सरी बरसल्यावर..
फुलते आयुष्याची बाग..
मनी असे प्रसन्न वाटते..
जसे ऐकून यमन राग..
बागेतील फुलांच्या सुवासाने..
आयुष्य सुगंधित झालं..
जणू फुलांच्या रंगाप्रमाणे..
आयुष्य रंगीबिरंगी झालं
आयुष्य रंगीबिरंगी झालं
