STORYMIRROR

Atharva Gokhale

Others

3  

Atharva Gokhale

Others

शब्दवेल

शब्दवेल

1 min
168

शब्दवेल ही फुलली, 

बहरली मोहात हरवली, 

कधी बंद दारात, 

दाट हिरव्या वनात, 


पाझरलेल्या शांत मनात, 

गुंतली क्षणात गुंफली, 

कधी कोरडा ग्रीष्म,

ओला चिंब वसंत, 


भावनांचे भाव सुद्धा, 

पर्ण दर्शवित जाई, 

कधी रंगीत रान, 

मनी रुसलेली जुई, 


वेलींचे मूळ हे, 

खोलवर रुजणार आहे, 

नटलेली शब्दवेल ही, 

भविष्यातही गाजणार आहे, 


साहित्याला गुण द्या
लॉग इन