नाळ आठवणीची
नाळ आठवणीची
1 min
240
नजरेची ही वाट,
शोधीत नवं काठ,
अफाट सागरात येई,
लाजलेली एक लाट,
लाजलेली एक लाट,
क्षणात विरून जाई,
ओलाव्याचा स्पर्श तो,
मनी बिंबवून राही,
स्पर्श तो ओलाव्याचा,
अन् साथ या मातीची,
सांजेची ती वेळ,
जोडिते नाळ आठवणीची,
खंबीर असा सूर्य,
रात्रीस दाखवी पाठ,
चंद्राच्या या शीतलतेला,
मोकळी ही वाट,
अफाट सागरात येई,
लाजलेली एक लाट,
