हृदय
हृदय
प्रेम हृदयात साठवावे
नको तिरस्कार मनात
माणुसकी अखंड राहो
माया सदैव हृदयात १
प्रभु चरण आठवावे
समाधान सेवेत असावे
हृदयात त्यास भरावे
कर जोडून शरण जावे २
निंदा सर्वथा त्यजावी
हृदय विशाल करावे
दोष ध्यानी न आणावे
सर्वां आपलेसे करत जावे ३
प्रभू करावा हृदयस्थ
तोचि असे जगतात
केव्हा कळे माणसाला
तोचि भरला चराचरात
