होतं असं कधी कधी
होतं असं कधी कधी
होतं असं कधी कधी
की न कळे कारण ना कळे निमित्त
एक एकात एकांत
आणि एक सर्वांतही एकांतच
ना इच्छा ना उत्साह
नको कोणता प्रश्न
नकोत ती उत्तरं
माहीत नाही काय आहे हे
नुसतं राहावं गप्पं
बरं गप्पं राहुनही हाती काही नाही
बरेच दिवस झाले ना हसणे झाले काही
म्हणलं का होतय असं घ्यावा त्याचा शोध
म्हणलं का होतय असं घ्यावा त्याचा शोध
पण हाती लागेल का काही?
की अजूनच गुरफटत जाईन मी?
माझ्यातला मी आहे ना?
याचं उत्तरदेखील ना मिळे काही
हे सर्व चालू असताना एक जण मला म्हणालं,
उत्तरं का शोधावी बरं
आहे तसं चालू द्यावं
त्या एकांतालापण मिरव म्हणावं
हा ही दिवस जाईल
कशाला कशाची घाई
मन नसेल तरी करावी नेहमीची कामं चोख
न केलेलं थोडं करुन पाहवं
गोष्टी तर होतच राहतील
दिवस तर सरत राहतील
जाईल हीपण वेळ निघून
कशाला शोधत बसायची कारणं आणि निमित्तं
गुंतून राहणं आपल्यातच बरं
गुंतून राहणं आपल्यातच बरं!
