अनमोल आठवणी
अनमोल आठवणी
1 min
172
असतं का हो आठवणींना काही मोल?
नि:शब्द कधी त्या, त्या कधी अबोल
कधी कधी तर एकामागुन एक
जसा वसंतातील फुलांचा बहर!
ना सुटता सुटत
ना कधी ठरवून येत
असतं का हो आठवणींना काही मोल?
गालात असतं हासु पण डोळ्यात रडू
ते क्षण आठवणीतले म्हणून हसायचं की
आता ते पुन्हा नाही येणार म्हणून रडायचं?
उपाय हाच की त्या आठवणींत रमून जायचं
कारण का……..आठवणी या असतात अनमोल
आठवणी या असतात अनमोल!
