राहून गेलं खूप काही
राहून गेलं खूप काही
1 min
291
तिच्या आवडीचं काहीतरी करणं राहून गेलं
तिचा रुसवा झेलणं राहून गेलं
तिच्यासोबत हसणं राहून गेलं
तिच्या हातचा मोलाचा घास खाणं राहून गेलं
तिचे सगळे कठीण प्रसंग निभावले तिनेच
तिच्या चांगल्या क्षणांत आभासही नव्हता माझा
तिच्यासोबत माझं जणू काही जगणंच राहून गेलं इतक्या वर्षांत!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन कुणीतरी येतच असतं
भेटीगाठी तर बरयाच माणसांशी होतात
कधी नवीन घट्ट आणि कधी घट्ट वाटत असलेली नवीनच वाटु लागतात!
घट्ट माणसांना जपणं खूप महत्त्वाचं असतं, पण तेच करणं राहून गेलं इतक्या वर्षांत!
