होईल का दूरावा गोड असा*
होईल का दूरावा गोड असा*
प्रतिक्षेचा तो दिवस रात्रीचा
गर्तेत अडकला असा कसा
डगमगत्या उसण्या अवसानाला
होईल का 'दूरावा' गोड असा।।
अथांग सागराची लाट तू अन
मी तूझा किणाऱ्याचा काठ
ओहोटीच्या अनामिक भितीने
फिरवू नकोस अशी पाठ ।।
आकाशातील लुकलुकत्या चंद्रीका
तुला स्पर्शती ती खट्याळ वारे
अमावस्येच्या रात्रीलाही पडतील
कदाचीत चंद्राला ग्रहण बरे।।
विवंचनेत तू असशी कदाचित
होईल का कधी अपूल्या भेटी
सांगशिल का मजशी गुन्हा
काढशिल कां निकषातून गुढी ।।
स्मरन करून तुझी वचने सांजेला
निळ्या नभाची छाया मिळे
सोसेना आता हा दूरावा तुझा
नजरेची भाषा मजशी कळवळे।।

