STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

*हळू हळू*

*हळू हळू*

1 min
54

निघून जाते घडी क्षणांची ही प्रेमाची हळू हळू  

तू बाजूला ठेव काळजी क्रूर जगाची हळू हळू  


देऊ नकोस कुपी विषाची हातात प्रिये अशी मला

होईल मला जगता जगता सवय विषाची हळू हळू  


हरलोय मी जिंकलास तू मानून घेऊ खरे तुझे

चाखून पहा चव जराशी तू हरण्याची हळू हळू 


देऊन दगा काय मिळाले गुपीत राणी सांग तुझे 

कबर खोदली आपल्याच तू बघ नात्याची हळू हळू 


वसंता तुला जाग कशाला आली आता उन्हाळ्यात

उगम पावली नयनात नदी विना ढगाची हळू हळू 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy