हिरवा चुडा
हिरवा चुडा
प्रसन्न प्रहर समयी
दारी पडलाय फुलांचा सडा
लेवून नववधू भरजरी शालू
किलकीलतो हाती हिरवा चुडा
पाणी घाली तुळशीला
सौभाग्याचं कुंकू भाळी
देवी मातेचं नाम मुखी
मन साजणा जवळी
मागणं मागे आईला
संसार होऊ दे गं सुखाचा
छाया ठेऊन शिरावर
सांभाळ कर माझ्या मंगळसूत्राचा
मिळालं जसं प्रेम माहेरा
मिळू दे तशी सासरी माया
आयुष्यभराचे आम्ही सोबती
आम्हा आई तूच ताराया

