कुंकू माझ्या नावाचं
कुंकू माझ्या नावाचं
तापून निघालेली जमीन
तिला पावसाची आस
वेड्या माझ्या मनाला
तू असण्याचा भास
जेव्हा कोसळला तो सरसर पाऊस
मातीशी तो एकरूप झाला
मनाला मन जेव्हा भिडले तुझ्या
प्रेमाचा पाऊसही बरसू लागला
मनःशांती झाली मातीची
पाण्याच्या एकरूप होण्याने
सुरू झाली प्रेम कहाणी
तुझ्या गोड हसण्याने
आनंदाच्या भरात केली तिने जादू
पीक फुलवून भरली शेतकऱ्यांची झोळी
संसारही आपला सुंदर झाला
माझ्या नावाचं कुंकू लावलं जेव्हा भाळी

