STORYMIRROR

Jeevan Bhambere

Romance

3  

Jeevan Bhambere

Romance

गंध

गंध

1 min
137

वेड तुझं वेड मला , वेड लावी माझ्या जीवा

गुंतले हृदय तुझ्यात हे , वाटे सहवास तुझा हवा


वयात अंतर खूप जरी , भुलवून गेलीस माझ्या मना

स्पर्श फक्त तुझा व्हावा , माझ्या या सगळ्या तना


ऐकण्या तुझं बोलणं होतो क्षणोक्षणी आतुर मी

गंधात , श्वासात बसलोय का तुझ्या ही ग मी


वाऱ्याची झुळूक स्पर्शून जाता , तुझ्याच स्पर्शाचा होई भास

पहिल्या भेटीची मनात माझ्या , आहे खूप उत्सुकता अन् आस


समजून माझं मन भेटशील का मला बंधन सारे तोडून

मिसळून जाऊया एकमेकांत सारी स्वार्थी दुनिया ही सोडून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance