तू माझी स्वप्नपरी
तू माझी स्वप्नपरी
1 min
99
सांगून तू सगळं मला
करतेस जेव्हा मन मोकळं
बोलून माझ्याशी तेव्हा तुला
मिळतंय का ग बळ सांग ना
ताकद तुझी व्हायचंय मला
बळ द्यायचंय तुझ्या पंखांना
पवित्र हृदयाची भावना तू माझी
जीव व्हायचंय तुझा, या जीवना
घेऊनी हातात हात तुझा
खूप मोठं तुला बनवायचंय
सावली तुझी बनून कायम
तुझं विश्व मला सजवायचंय
आत्म्याच आत्म्याशी करून मिलन
करूया एकरूप दोन्ही हे जीव
विश्वसागरात या गोते खात
किनारी आपली लावूया नाव
