STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance Others

3  

Meenakshi Kilawat

Romance Others

हिंदोळ्यावर झुलती

हिंदोळ्यावर झुलती

1 min
185

हिंदोळ्यावर झूला झुलती कान्हासंगे राधारानी

श्रावणसरींत भिजूनी होइ वृक्षवाटीका तेजस्वीनी..!!

हिरवाईने नटूनथटून उंच कड्यावर डोंगर

तरुवेलीं या मृदगंधाचा भरे भरारा अंबर..!!

मंजुळ कुंजन करी पाखरे अरुनोदय हा झाला

थव्याथव्यांने घेइ भरारी वेचुनी आला पाला..!!

आकाशी या इंद्रधनूच्या छटा विहंगी वारे

प्रियात रमे रंगात भरे व्याकूळ असे न्यारे..!!

शुभ्र दुधांच्या उंचावरुनी उडती तुषार धारा 

येती मनात असंख्य लहरी शांतवितो हा वारा..!!

करे जलक्रिडा कान्हा अन जळती गोपीका बाला

रास खेळती खट्याळ गोपी मध्यरात्रीला लीला..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance