हे रंग तुझे मनास जुळणारे !!
हे रंग तुझे मनास जुळणारे !!
हे रंग तुझे मनास जुळणारे
हे पंख तुझे क्षितिजा भरी उडणारे
हे बोलणे तुझे लक्ष वेधणारे
हे वागणे तुझे मिठीत घेणारे !! धृ !!
हे स्पर्श तुझे मन मोहनारे
मनातुनी सर्व व्यक्त करणारे
आपलंसं जवळीक करणारे
अबोल्याससुद्धा बोलकं करणारे !! १ !!
हे रंग तुझे मनास जुळणारे……
हे स्पर्श तुझे सुखास कवटाळणारे
दुःखास सीमोल्लंघन करणारे
कधी वादातही सुख शोधणारे
आनंदमय वातावरण आपलंसं करणारे !! २ !!
हे रंग तुझे मनास जुळणारे…….
हे स्पर्श तुझे नात जोपासणारे
मोठ्यांचा अनादर न करता आदर करणारे
सत्य परिस्थिती जाणणारे
नात्यात निर्माण होणाऱ्या वादास मिटवणारे !! ३ !!
हे रंग तुझे मनास जुळणारे…….
हे स्पर्श तुझे भान हरवून टाकणारे
बोलण्यात मात्र तुझ्यासोबत गुंतणारे
कितिवा असो खंत अथवा दुःख मनात
तरीही त्या गोष्टीचा विसर पाडणारे !! ४ !!
हे रंग तुझे मनास जुळणारे…….
जणू तुझ्या या प्रेमात
माझ्या जगण्याचे गूढ असावे
शोधूनही न मिळे असे ते सखोल असावे
असे हे रंग आपल्या प्रेमाचे असावे
असे हे रंग आपल्या मैत्रीचे असावे
कितीही दुरावा असो तरी एकदातरी आपलंसं करावे !!५!!
ते दूर का होईना पण कधीतरी आपलंसं भासावे
कितीही दुरावा असो तरी एकदातरी आपलंसं करावे !!५!!
ते दूर का होईना पण कधीतरी आपलंसं भासावे

