Happy Promise Day
Happy Promise Day
दे तू वचन आज हे नाते जपण्याचे ..
फेड पारणे तुझ्या माझ्या मैत्रीचे ..
अबोल भाषा गंधाळले शब्द
करतो आज तुला मी वचनात बंध ..
रसाळ शब्दांना तुझ्या पैलतीर गाठायचे ..
ह्या प्रवासात शेवटच्या स्टॉपवरचं थांबायचे ..
फुलाचे फुलणे सुंगध पसरवतात...
तुझ्या माझ्या नात्याच्या भावना त्याहूनही सुंदर फुलतात
मधाची गोडी ह्या नात्यात चाखायची ..
तुझ्या आयुष्यात नसताना सुद्धा तुझ्यासाठी स्वप्न पाहायची
तुला माझ्या आयुष्यात राधाची द्यायची आहे जागा
सांग तुझ्या आयुष्यात ह्या कृष्णा साठी आहे का कप्पा रिकामा ...
देशील का वचन मला तु कृष्ण बनवण्याच ..
वचन हे आयुष्यभर निभवण्याच ..
मन एक लेखणी

