हास्य चित्र
हास्य चित्र
मी काढले
एक चित्र
ते होते
फार विचित्र
आईने दिला
पुन्हा प्रयत्न
करण्याचा मंत्र//१//
पहिले चित्र
काढले माणसाचे
ते दिसू लागले माकडासारखे //२//
दादा पोट
धरुन हसला
तुला चित्र
काढायला
जमणार नाही म्हणाला//3//
जिद्दीने शिकले
चित्र कला
त्याच चित्राचे
फोटो काढून
दादा ही ठेवला
आपल्या स्टेटस ला//४//
अशी कहाणी
माझ्या चित्रकलेची
यातूनच शिकले
कला जगण्याची//५//
