STORYMIRROR

Shruti Choudhari

Others

3  

Shruti Choudhari

Others

हास्यचित्र

हास्यचित्र

1 min
220

मी काढले

एक चित्र

ते होते

फार विचित्र

आईने दिला

पुन्हा प्रयत्न

करण्याचा मंत्र ||१||


पहिले चित्र

काढले माणसाचे

ते दिसू लागले

माकडासारखे ||२||


दादा पोट

धरुन हसला

तुला चित्र

काढायला

जमणार

नाही म्हणाला ||३||


जिद्दीने शिकले

चित्र कला

त्याच चित्राचे

फोटो काढून

दादाने ही ठेवला

आपल्या स्टेटस ला ||४||


अशी कहाणी

माझ्या

चित्र कलेची

यातूनच शिकले

कला जगण्याची ||५||


Rate this content
Log in