STORYMIRROR

Poonam Kulkarni

Romance Classics Others

3  

Poonam Kulkarni

Romance Classics Others

हा पाऊस

हा पाऊस

1 min
11.7K

नवीन आशा दाखवतोय,

बळीराजाचे पांग फेडतोय,

नवचेतना जागवतोय,

हा पाऊस.....


झाडांना बहरून टाकतोय,

निसर्गाला न्हायला घालतोय,

मनाचे मळभ दूर करतोय,

हा पाऊस.....


धरतीला नव्याने भेटतोय,

तिला सजवतोय,

नद्या नाल्यांना उत्साहित करतोय,

हा पाऊस.....


अंगावरती शहारा आणतोय,

चिंब भिजवून टाकतोय,

हळुवार स्पर्शतोय

हा पाऊस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance