STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

हा खेळ दैवाचा (गझल)

हा खेळ दैवाचा (गझल)

1 min
129

सोडले अता मनात घाबरून जायचे 

वादळास आज मात्र नाचवून जायचे


प्रेमदेवता नसेल जर प्रसन्न लाडक्या

का नशेत तू तुलाच संपवून जायचे 


मी इथेच झोपडीत राहतो तुझ्यापुढे

राजकारणी मलाच पेटवून जायचे 


सर्कशीत वेदनेस हासतात माणसे

आसवांस काळजात साठवून जायचे 


भाकरीस नोट नाय भूक खूप लागली

संत लोक तत्वज्ञान पाजळून जायचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy