STORYMIRROR

Bharati Raibagkar

Inspirational

4  

Bharati Raibagkar

Inspirational

हा देश माझा मी देशाचा

हा देश माझा मी देशाचा

1 min
840

अमृतमहोत्सवी वर्ष तरीही 

बाल्यावस्थेतच रांगतोय

सतत अनेक प्रयोगांसाठी

अजुनही गिनीपिग होतोय?


होता दिशादर्शक सकलां

वाट दाविली प्रगतीची

कधी झुगारून देणार?

मानसिकता गुलामीची


भ्रष्टाचार,अत्याचार,अनीती 

म्हणे, देश आपला महान

संस्कृती, सभ्यता, मूल्यं

सारंच ठेवलंय गहाण?


भेदाभेद, विषमता,जरी

तत्त्व, सर्वधर्मसमभाव

कां? कुठे? कधी? कसे?

प्रश्नच प्रश्न, लागेल ठाव?


फक्त मुलींना नसोत बंधनं

मुलांनाही द्यावे बाळकडु

सुसंस्कृत आचरण आपले

त्यांना ना देई बिघडु


बालपणी हवी शिकवण

परनारीस द्यावा आदर

मायभगिनी सम मानावे

वासनांध नकोच नजर


इवले इवले हात जेधवा

कचर्‍यात वेचती धन

द्यावे पुस्तक हाती तयांच्या

वेचण्यास्तव ज्ञानकण


कन्या, जननी उदरात

प्रकाशाची वाट पाही

लावु ज्योत तिच्यासाठी

खुल्या असो दिशा दाही


नको आदर्श सीतेचा

लक्ष्‍मी मर्दानी घडवावी

रक्षणासाठी कोणावरही

न अवलंबुन रहावी


अनेक असती प्रश्न, परी

हा देश माझा, मी देशाचा

मनीं नसे भावना जोवरी

काय उपयोग उत्तरांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational