गुरू
गुरू
किती गावू गुरूचे गुणगान
कार्य तुमचे चंदना समान||
कौन बतावे बाट गुरु बिन
बड़ा कठिन यम घाट गुरु बिन||
तुमच्यामुळे मज प्राप्त झाले शैक्षणिक ज्ञान
याच ज्ञानाच्या आधारे जगण्याची वाढली शान||
आज गुरुपौर्णिमेनिमित्त एकच सांगणं,
माझे तुम्ही गुरू याचा मला अभिमान||
तुमचे आशीर्वाद सोबत राहो हे मागणं
तुमच्या चरणी राहीन मी सदैव कृतज्ञ||
काव्य रुपात श्रीफळ, पुष्प करते अर्पण
तुम्हास माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन||