गुरु वंदना
गुरु वंदना
तुम्हा विण गुरू आम्हां तारेल कोण?
पंथ न सापडे मज फिरतसे वण वण.
एकांती चालत जाता शोध मिळेना
मार्ग भटकलो कसा ते ही कळेना
क्षणाचा विसावा घेऊन लाविले ध्यान.
आठवले तत्क्षण मजला मातृ ज्ञान
मात् पित्याची माया तुझ्या शिरावर
चिंता कशाला मग सोड देवावर
शालेय गुरूंनी दिले सखोल अक्षर ज्ञान
त्यांच्या कृपेने मिळाले समाजात सन्मान
ग्रंथगुरू ही दैवत अति पावनकारी
शुद्ध विचार होऊन झालो संस्कारी
देती अफाट ज्ञान वांग्मय रचून
अश्या साहित्यरसिक गुरूंना वंदन.
