तू आणि मी(कायकु रचना)
तू आणि मी(कायकु रचना)
(मराठीत प्रथम प्रयत्न 7- 5- 7)
अबोध या प्रेमात
हवी संगत
फक्त नि फक्त तुझी
पाणीदार हे डोळे
सांगून जाती
तुझाच मी तू माझी
जोवर देही प्राण
प्रेमाच गाणं
तुज संगे गाईन
एक क्षणही नको
तुझिया विना
मरण बरे मग
आतुरली मी जशी
चातक पक्षी
पाण्याची वाट पाही
कृष्ण विना बासरी
अस्तित्व काय
माझेही झाले तसे.
तु कृष्ण मी राधिका
वृंदावनात
वाट पाहत बसे.
जगणे अवघड
होईल मला
पाठ फिरवू नको
डोळे भरून पाही
हे रूप तुझे
ईश्वरच जणु तू
मायेचे पांघरूण
प्रेमाची साथ
फक्त तुझीच हवी.

