परमार्थाने जग
परमार्थाने जग
जाणती उक्ती
थेंबांनी साचे तळे
साठा कर्माचा.
पाप पुण्याची
झाली हो भेळसेळ
गर्व कसला ?
खेळ निराळे
कुकर्माचे सर्वथा
फळही मिळे
पश्चातापाने
अश्रुबिंदू टपके
वेळ हो गेला.
सांगते *मिनू*
परमार्थाने जग
येईल कामी.
