गुगलवर सर्च
गुगलवर सर्च
तू छोकरी आय फोन सारखी
तुझ्यावर जीव जडला
तुझ्या नयनात जो हरवला मारे
गुगलवर सर्च ना सापडला.....
तुझी चाल सापा सारखी नजर हटेना
तुझ्या गालावर डिम्पल काही सुचेना
तुझा आवाज रिंगटोन माझ्या कानी पडला....
तुझ्या नखऱ्यात जीव झाला वेडा
दे मला तुझ्या प्रेमाचा पेडा
तुझ्या प्रेमाचा वायरस मला भिडला....
तुझी सगळ्यात वेगळी लुक
मी चेक करे तुझ रोज फेसबुक
तुझ्या रुबाबाचा रिपोर्ट मी फाडला....
तुझ्या प्रेमाची सापडेना वेब साईट
संगमला घेवू नको तू लाईट
नीट बघ माझ्या प्रेमाचा भाव वाढला....

