STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

गोष्ट एका प्रीत मिलनाची

गोष्ट एका प्रीत मिलनाची

1 min
231

गोष्ट आहे दोन 

प्रेमवेड्या पाखरांची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची 


सोबत असूनही युगानुयुगे 

गोष्ट लांबच्या नात्याची

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


आतुरलेल्या तिला 

आस आहे त्याची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


वाळवंटासमान शुष्क झालेल्या तिला 

तहान फक्त त्याची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


भेटायला एकमेकांना 

साथ हवी असतें निसर्गाची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


गडगडले ढग लकाकल्या वीजा 

इशारद झाली प्रेमाची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


झाली भेट ओझरत्या क्षणांसाठी 

दोन प्रेम वेड्यांची 

ओढ त्या दोघांना 

फक्त एका प्रीत मिलनाची


गोष्ट होती ती विशाल धरती माय आन 

तिला आपल्या थेंबांनी महान करणाऱ्या पावसाची 

ओढ पृथ्वीच्या अंतांपर्यंत 

फक्त एका प्रीत मिलनाची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance