गोड स्मरण
गोड स्मरण
रम्य जुन्या दिवसांची
आहे मज आठवण
जेथे भेटलो आपण
केली मनी साठवण
किती केलेस नखरे
कधी नसे वेळेवर
मात्र मी असे उभाची
तुझ्या भावा बरोबर
हात तुझा माझ्या हाती
दिली वचने जोडीने
पहा हसली सुमने
पाहुनीया ती प्रीतीने
आज आलो तेथे दोघे
चंद्र पहा हासला
आठवून तीच रात
वृक्ष फुलानी बहरला
अशी भेट स्मरणात
कसे होई विस्मरण
तुझ्या माझ्या मनातली
राही सदा आठवण

