STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Others

4  

vaishali vartak

Abstract Others

गजरा

गजरा

1 min
234

फुले धाग्यात ओवता

होतो सुगंधी सुंदर

मन मोहक गजरा

दिसे पहा मनोहर


जातो सहजच हात

माळण्यास कुंतलात

फुले देतात आनंद

भर भरुन जीवनात


असे गजरा मोहक

वाढवीतो सौंदर्याला

आकर्षक दिसे रूप

उपयोगी शृंगाराला


नारी नेमाने माळीती

येता जाता प्रसंगात

मानी सौभाग्याचे वाण

देण्या हळदी कुंकुवात


मोग-याचा सुगंधित

हवा सदैव गजरा

मन राहते प्रसन्न 

पहा वळती नजरा


एक गजरा देवा-ही

सुगंधित आसमंत

वाटे बसावे पहात

रूप देवाचे मूर्तीमंत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract