STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

गझल

गझल

1 min
199

रात्रीस खेळ चाले..झोपायचे कसे

कोणास ते कळेना..बोलायचे कसे


आकाश आज आहे..चंद्राविणा सुने

अंधार रात्र आहे.. चालायचे कसे


विश्वास ठेवतो मी..देवावरी तसा

भक्तीत लीन पाहू ..तारायचे कसे


नशिबात भोग आहे.. चुकणार ते कसे

आहेत भोग माझे.. भोगायचे कसे


जगण्यास अर्थ नाही..जीवन असे कसे

"शोभा"स ते कळेना...साधायचे कसे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational