घुंगरू छमछम पायी
घुंगरू छमछम पायी
घुंगरू छमछम पायी बांधून
मांडले तुमच्या गावात बस्तान
मिळेल कां हो राया तुमची तान
नाही उरले मज जगाचे भान..
माझी लावणी गाणं मधूर माझं सपानं
साजना,तुमच्या इश्काची मी भरली घागर ॥
पायी बांधून घुंगरू नाचले मी
राया वऱ्हाडात छान रमले मी
आले या कोल्हापूर गाजवून मी
कलकत्ता प्रितीने भारवून मी...
मेंदीच्या पायी थिरकली प्रितीचा मंजर
साजना,तुमच्या इश्काची मी भरली घागर॥
प्रितीचा नशा काळजात भरला
तुमच्या रंगा नाद दरवळला
अस्सल करडी तुमची नजर
माझ्या मनावर प्रितीचा असर..
कशी खिळली माझ्यावर ही तुमची नजर
साजना,तुमच्या इश्काची मी भरली घागर॥
कधी विसरेन जीवनी मी याद
राया प्रेमाची द्यावी ऐकांती साद
मी कलाकामीनी माझ्या फडाची
ना पर्वा केली पायातील फोडाची...
चांदणी प्रेमाची नाही मजला घरदार..
साजना,तुमच्या इश्कानं मी भरली घागर
तुमच्या प्रितीचा मी प्यायला पेला
राया तुमच्यासाठी शृंगार केला
रूपेरी चांदण अतीव सुंदर
प्रितीनं भरेन तुमचा सागर...
तुझ्या इश्काचा आधार भरते नृत्य झंकार
साजना,तुमच्या इश्काची मी भरली घागर॥
बांधले घुंगरू पायीचे घायाळ
वाजती पखवाज कानी मवाळ
रूपाचे करती भूंगे रसपान
जाणे का कोणी कदर मानपान..
भाव अलवार रूळले तुमच्या काळजात
साजना,तुमच्या इश्काची मी भरली घागर॥

