घटक
घटक


मंजूळ पक्षी साद जागवे सकाळी
ऋतू बदल चाहूल फळांची
मधुर कोकीळ गान देई
गुणगुणते पक्षी संगीत भोवती
भिरभिरती पाखरे नित्य अंगणी
नसेल काही किलबिल ही शांत
उदास भकास निरस सर्वत्र
होता पक्षी पाखरे लुप्त नष्ट
दिन दूर नाही तो आज
ओरबाडून वने, इमारती मनोरे
तरंग कंपीत आकाश सारे
विखारी जीवघेण्या लहरी
तुझे तीर, तारा पक्ष्यांस फास
निघून गेले उडाले दूर देशी
धरती सरिता वृक्ष वल्ली
पशु पक्षी प्राणी अवघे
निसर्ग जीव श्रुंखला घटक सारे
>
भूमी बीज रुजवी वृक्ष बहरे
पशु पक्षी जीव आसऱ्यास
फल बीज उदरी घेऊन उडती
नवे नवे वृक्ष पुढे पसरते रान
तेथे तेथे जीव स्रुष्टि सजीव
घेऊन परतफेड करतात सारे
तु काय देतोस कोणास जगवतोस
तुझ्या सारखा स्वार्थी तुच माणसा
नाहीस एकटा तु अधिकारी
घटक मात्र तुही स्रुष्टिचा या
नसेल वृक्ष पशु पक्षी जीव
तर नसशील तुही जाण
थांबव हव्यास, पुरे लोभ मोह
जगव वाढव वृक्ष रान
जगुदेत पशू पक्षी जीव
होऊ नकोस केवळ स्वार्थी माणसा
हो वृक्ष, पक्षीमित्र माणसा