घर
घर
आचार, विचार ही घराची आखणी आहे.
प्रेम हा घराचा पाया आहे.
थोर माणसे घरांच्या भिंती आहेत,
सुख हे घराचे छत आहे,
जिव्हाळा घराचा कळस आहे.
माणुसकी ही घराची तिजोरी आहे.
शांतता ही घराची लक्ष्मी आहे.
दुजाभाव विसरणे ही घरातील समई आहे.
पैसा हा घराचा पाहूणा आहे.
गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे.
नम्रता ही घराची प्रतिष्ठा आहे.
समाधान हे घराचे सुख आहे.
सदाचार हा घराचा सुगंध आहे
अशाच घरात प्रभूचा वास आहे.
