STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

2  

Prashant Tribhuwan

Inspirational

घे उंच भरारी

घे उंच भरारी

1 min
571

घे उंच भरारी

खुल्या आसमंती

विसरून तू जा

लोक काय म्हंती.....१


लढताना तुला

येतील संकटे

न लढला तर

दुःख मनी वाटे......२


तू संकटावर

करत जा मात

पाणीच तू काढ

मारता रे लाथ......३


लढ संकटाना

समजून संधी

कर आक्रमण

बनून तू आंधी......४


न डगमगता

जा लढत असा

जीवन संग्राम

आहे आता जसा.....५


घे उंच भरारी

तू ह्या संग्रामात

भीती न बाळग

तुझ्या काळजात......६


प्रशांत त्रिभुवन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational