STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

गावी चाल मित्रा

गावी चाल मित्रा

1 min
51

घेऊन आज सुट्टी येऊ फिरून मित्रा

थोडे चलायचे का गावाकडून मित्रा

शहरातला उन्हाळा देहास सोसवेना

गावी नदीत थोडे येऊ बुडून मित्रा

डोसे भजी समोसे खाऊन वीट आला

चिंचा रसाळ आंबे येऊ चखून मित्रा

बांधू कसे घराला माती महाग आहे

गावी जुना निवारा येऊ लिपून मित्रा

फेकून दूर छत्री पाऊस चाल खेळू

पाण्यात पावसाच्या नाचू भिजून मित्रा

गर्दीत माणसांच्या माझा कुणी दिसेना

खेळू लपाछपी मी जातो लपून मित्रा

आईविना कुठे रे प्रेमास अर्थ आहे

आईस भेटताना आले भरून मित्रा

लाटेत सागराच्या वाहून शंख आले

धावून शंख घेऊ गोळा करून मित्रा

रोखू कसे कळेना डोळ्यात आसवांना

ये ना मिठीत माझ्या घेऊ रडून मित्रा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy