गारवा
गारवा
हवेत होता गारवा, झूळूक थंड वा-याची
वृक्षावरच बसले पक्षी ऊब त्यांना पानांच्या सहा-याची
आभाळी निळ्या पांढ-या ढगांची संगत
दूर डोंगराआड धुकयांची सरळ मोठी पंगत
पहाट होती तरी कोवळ्या उन्हाचीच आस
किलबिलाट पक्ष्यांचा सूरूच होता खास
लपला होता सुर्य आडोशाला कोठेतरी
जणु तयारी होती ती कोसळण्याच्या पाऊसरी
तलावाच्या संथ पाण्यातही वाहात होता रानवारा
दिवस सुरू झाला तरी सुस्तच होता आसंमत सारा
