STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2.7  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

गाणे संगणकाचे

गाणे संगणकाचे

1 min
17.3K



यंत्र मानवा तू केला नवा चमत्कार

संगणकीय युगात आपले स्वप्न झाले साकार,

न्यारे आपले कार्यक्षेत्र एक आपला विचार

जगाच्या या स्पर्धेत तुझे बहुमोल कार्य विस्तार,

कार्यक्षेत्र वाढले, जीवन केले सुकर

जगाचे हित साधण्यास तूच किमयागार...


शेतकरी, कामगार यांना ठरले वरदान

सर्व जगाला शिक्षण देतो तू एक महान,

जगाच्या या शिक्षणात तुझा अविष्कार

सर्व जगाला आश्चर्याचा झाला साक्षात्कार,

यंत्र मानवा तू केला नवा चमत्कार

संगणकीय युगात आपले स्वप्न झाले साकार...


तुझ्या शिक्षणाने इथे झाले सर्व साध्य

तुझे जगात आहे उज्वल भविष्य,

संगणकीय शिक्षणाचा डंका जगभर

खरेपण, विश्वासू तू खरा इमानदार,

यंत्र मानवा तू केला नवा चमत्कार

संगणकीय युगात आपले स्वप्न झाले साकार...


शेती असो, हिशोब असो तुझा चमत्कार

जगाच्या या पाठीवर तूच शिल्पकार,

संगणक तू आहेस बुद्धीचे भांडार

आमच्या सर्वांचा तू आहे रे आधार,

यंत्र मानवा तू केला नवा चमत्कार

संगणकीय युगात आपले स्वप्न झाले साकार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational