एवढं तरी करशील का?
एवढं तरी करशील का?
स्वर तुझ्या बासरीतील
तू मला बनवशील का?
नाही भेटला प्रत्यक्षात
स्वप्नात तरी भेटशील का?
सापडेल वादळात मी कधी
साथ मला देशील का?
तुझ्याच रे कवितेची
कल्पना मला बनवशील का?
जीवनाच्या स्वारस्याचे
अमृत मला देशील का?
माझ्या उदयाचा तू
भाग्योदय होशील का?
तुझ्या ओठावरचे हास्य
तू मला बनवशील का?
भाव माझ्या डोळ्यातील
तू समजून घेशील का?

