एवढे करून तर पाहा!
एवढे करून तर पाहा!
आरश्यासमोर तुम्ही उभे राहून तर पाहा
तुमचेच सुंदर प्रतिबिंब निरखून तर पाहा
तुम्ही बोलक्या डोळ्यांना निरखून तर पाहा
डोळ्यांना वाचायचा प्रयत्न करुन तर पाहा
चेहऱ्याचा हावभाव पण निरखून तर पाहा
मनातल्या मनात स्वत:शी लाजून तर पाहा
स्वत:च्या ओठांना पाहून मंद हसून तर पाहा
कधीतरी स्वत:च्याच प्रेमात पडून तर पाहा