STORYMIRROR

Kalpesh Vyas

Tragedy

3  

Kalpesh Vyas

Tragedy

प्रेमकहाणी

प्रेमकहाणी

1 min
201

हाच जुना तो रस्ता, जिथून नेहमी तो जायचा

त्या दाराजवळ येताना, घंटी पण वाजवायचा


त्या सायकलची घंटी, नेहमीच ती ओळखायची

खोलीतून धावत येवून, दाराकडे ती थांबायची


तो तिलाच पाहायचा, ती त्यालाच पाहायची

तो पुढे निघून जायचा, ती खोलीत परत जायची 


तो तिच्या मनात राजा, ती त्याच्या मनात राणी

कधीतरीच्या काळात, अशी होती प्रेमकहाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy