STORYMIRROR

काव्य चकोर

Tragedy Others

4  

काव्य चकोर

Tragedy Others

एल्गार

एल्गार

1 min
229

झाली कवने अपार पण कुठे मिटला अंधार..

शब्द सारे पोकळ अन् फसवा त्यांचा आधार..!!


घृणा आणतोय मनी तुमचा मेणबत्तीचा शृंगार..

राख झालेल्या भावनांचा विझून गेलेला अंगार..!!


पुरे झाली पूजा तुमची तुम्ही नका चढवू हार..

बेगडाच तुमच्या मुखी दिसतो माणुसकीचा प्रचार..!!


कळ्या कळ्या कुस्करून मांडलेला निर्लज्ज बाजार..

लांडग्याची भूक तुमची करते हिंस्र नीच अत्याचार..!!


तुमच्यातील पुरुष सैतान सांगा माणूस कधी होणार..?

त्याचा पाशवी कृत्याविरुद्ध कधी छेडणार एल्गार..??



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy