एकांत
एकांत
किती सुखी शांत होतो मी आत्मसुखात
निरव स्तब्ध ध्यानस्थ स्वस्वरुपात !
ना ओढ कसली ना आसक्ती
कधी मोह नव्हता भय ना क्षयाचे !
संग्रही असे होतेच काय ?
अन तू प्रकटली....
अन तू प्रकटली प्रभात म्हणूनी
भंगली समाधी दृष्टी दिपूनी
तव दिव्य तजो प्रवेशाने
गुंतत गेलो तव रति-पाशात
विरुनी गेलो तव अस्तीत्वात
लुप्त अस्तीत्व तजो बल सत्व
परी तू चंचल स्वछंदी
प्रवाही लहरी मुळची
मावळता तू संधीकाली
तिमीर मात्र शेवटी ऊरलो
गुढ भयंकर भासते सारे
भय मज आता स्व स्वरुपाचे
काळोख कबहिन्न परिचीत झालो
शोक अतृप्त अदृष्य अंतरी
तव दोष ना कसला
मज भूल मी भूललो
सर्वस्व हरवूनी अंती
झाहलो हा शाप एकांत..शाप एकांत
