एकाग्रता
एकाग्रता
सर्व मानसिक,शारिरीक ऊर्जा,केंद्रीभूत करणं म्हणजे एकाग्रता,
प्रत्येकात असते ही ऊर्जा,एकत्र करावी ही क्षमता
मन एकाग्र केल्यावर,अफाट कल्पना जन्मतील,
बुद्धी एकाग्र केल्यावर, ज्ञानाचा बोध होईल
एकाग्रता बनवते शक्तिशाली, काळवेळेचं नाही राहत भान,
असाधारण शक्ती प्रकटते,सर्वोत्कृष्टतेचे लागते ध्यान
लक्ष्य निश्चित हवं तर, तिथपर्यंत पोहचता येतं,
एकाग्रतेचा निर्धार, अशा वाटेने घेऊन जातं
