STORYMIRROR

काव्य चकोर

Romance Others

4  

काव्य चकोर

Romance Others

एक स्पर्श..

एक स्पर्श..

1 min
273

एक स्पर्श स्पर्शातला, हळुवार स्पर्शुन गेला..

माझ्या अधीर मनाला, नकळत हर्षून गेला..!!


बावरले मन जरासे, तिचा चेहरा सांगून गेला..

अन् हृदयाचा ठोका माझ्या, सीमा लांघून गेला..!!


एक कटाक्ष चोरटा, आश्वस्त करून गेला..

मन मनाचा होकार, नजरेत भरून गेला..!!


मी निश्चल उभा वाटेवर, तो चेहरा दूर गेला..

माझ्या सुन्या मैफिलीचा, तो सूर होऊन गेला..!!


काय होते त्या स्पर्शात, हे सांगुन जरूर गेला..

हृदयास बिलगून माझ्या, लावून हुरहूर गेला..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance