एक सल ...
एक सल ...
मन पुन्हा तेच वळण घेत
वाटेत दुखच्या काचा वेचत
ओळख कोणती होत मागत
का कुणास कळतच नव्हत
मन पुन्हा तेच वळण घेत
आठवणिच्या गोतावळ्यात
कहाणी कोणत ते शोधत
अधुर चित्र काढायला मागत
मन पुन्हा तेच वळण घेत
पुढच पाऊल माग वळत
पाऊलखुणात छबी शोधत
अस कोणत गणित ते सोडवत असत
मन पुन्हा तेच वळण घेत
आधारची काठी मायेची नाती
गळूनी पडली ती नाळ खोटी
तरी धाग्यात बंध शोधत असत
मन पुन्हा तेच वळण घेत
नसत काहीच त्याच असणं
जाणूनि सार का विसरू पाहत
पुन्हा पुन्हा तिच आस का जागवत
मन पुन्हा तेच वळण घेत
आई च्या मायेला आसुसत
बापाची सावली ला तरसत
भावाच्या शब्दात जगत
बहिणीच्या डोळ्यात विसावत
मन पुन्हा तेच वळण घेत
सासरची तुळस आपलीशी होते
घरची भिंत संगे ती बोलते
चुलीच्या विस्तवात स्वप्न जाळते
मन पुन्हा तेच वळण घेत
मुलांच्या हसण्यात समाधानी होत
त्यांची गोष्ट लिहिता लिहिता
नकळत आपला भूत काळ वाचत
मन पुन्हा तेच वळण घेत
असतील विसावलेली कुठेतरी
नवीनच होते मग पुन्हा त्या नत्यांत
गवसत ते जे असत नसत मनात
मन पुन्हा तेच वळण घेत
ऊन सावली च्या खेळा संग
नात्यातील खेळात रमत
एक गोष्ट तरी ते विसरत
मन हे फक्त मन असत
त्याच्या सारख दुसर कोणी नसत
कधी तळ्यात कधी मळ्यात
सुखात सुखी दु:खात दू:खी होत
मन पुन्हा तेच वळण घेत
एकाकी असत पण अस्तास घरदार नेत..
मन पुन्हा तेच वळण घेत
