दुरावा
दुरावा
कधीकधी हसून-हसून मला बघ,
तुझा स्मित चेहरासाठी वाटेत आहे मी बघ.
स्मितहास्य तुझे आहे अनमोल दागिने,
दुरुन-दुरुन मला बघून सारखे तुझे हसणे.
तुझ्या साठी केले मन मी माझे मोकळे,
दुरावा ठेवुन चांगले नसते असे प्रिये वागणे.
हसण्या सारखे मनमोहक तुझे नांव किर्ती,
माझ्या मनात तुझ्या स्मितीची बसली आहे मूर्ती.
मला भेटण्यासाठी मारत जा कधी खोट्या थापा,
नाहीतर तुझ्या दुराव्याने बिघडून जाईल माझा आपा.
आतुरतेने तुझी वाट बघते माझे मनमंदीर,
कधी आत शिर तुझेच आहे माझे मनमंदीर.
किती प्रतिक्षा तुझ्या आगमनाची मी करणार ?.
तुझा दुरावा मला नक्कीच हादरुन टाकणार.
तुझ्या प्रीतीचे ओझे मी किती वेळ झेपणार,
आकाशा एवढ्या प्रीतीचे भाराने मी कोसळणार.
तुझ्या वाटेने थकला आहे तुझा प्रियकर,
तुझ्या मन-मंदिरात कधी तु आत शिरणार.
संपुन टाक हा एकदाचा दुरावा आरपार,
प्रत्येक जन्मी मीच तुझा व तू माझी होणार.

