दुरावा
दुरावा
दूर तू आणि दूर मी
आणखी किती सोसू
जिवलगा दुरावा मी
झरते नयनातील आसू
तुझ्या विरहात न राहिले
पिवळ्या कांतीचे भान
ना केसाला कंगवा ना
कपाळी कुंकूवाला मान
तळपते कशी जशी
पाण्याविना मासोळी
रडते अशी भरते
अश्रूंनी मी ओंजळी
दुरावा दुरावा सख्या
छळतो हा दुरावा
कळवा कळवा सख्या
निरोप तुझा कळवा