दोर प्रेमाची
दोर प्रेमाची
त्याच्या प्रेमाची डोर,
मला खेचून नेत होती l
त्याच्या प्रेमाची साद,
माझ्या काळजात येत होती l
त्याच्या प्रेमाची नशा,
त्यात मी चिंब भिजत होती l
त्याच्या प्रेमाची लाली,
माझ्या गालावर चढत होती l
त्याच्या प्रेमाची प्याली ,
माझ्या ओठांवर टाकत होती l
त्याच्या प्रेमाची बेडी,
मला त्याच्यात गुरफटवत होती l
त्याच्या प्रेमाची डोर,
मला खेचून नेत होती l

