दोन मे(2)
दोन मे(2)
स त्ता आणि राजकारण
त डफडायला लावते
रा त्रीच्या झोपेचेही
व्या धीग्रस्त खोबरे होते....
दि वस येतात जातात
व रचष्मेही दिसतात
सा ळसूदपणाचे भावही रंगतात
ची डचिडमात्र फुकाची करून ठेवतात....
सां गून सवरून टिव्ही बंद
ज रा आंदोलनही करून पाहिलं
पण तसं तटस्थ राहणं
मला तरी नाही जमलं....
आज मात्र दिवस बरा गेला
सकाळी सकाळी मी नवाच
फंडा सुटकेसाठी अनुसरला
पोथी वाचनाचा संकल्पे सपाटा लावला....
काय आश्चर्य दीड तास
हा हा म्हणता सुखात गेला
मनःशांतीचा मार्ग गवसला
वाचनाचा छंदच जडला.......!
