STORYMIRROR

Rajesh Sabale

Romance

3  

Rajesh Sabale

Romance

।।दिवस गुलाबी थंडीचे।।

।।दिवस गुलाबी थंडीचे।।

1 min
336

गुलाबी थंडीत आले, राजा पहाटेच्या वेळी।

तुझी-माझी भेट झाली, सकाळी सकाळी।।धृ।।


गारवा उरात शिरता, अंग थंडगार झालं।

मिठीत तुझ्या येता, लई उबदार वाटलं।।

बोचऱ्या थंडीत येतो, कस्तुरीचा गंध।

तुझ्या हातात माझे, दोन्ही बाजूबंद।।

गुलकंद प्रेमाचा चाखू, सकाळी सकाळी।

गुलाबी थंडीत आले, राजा पहाटेच्या वेळी।।१।।


चांदण्याची रात सरली, नभ झालं लाल लाल।

पहाटेच्या दवात अंग माझं, न्हाऊन निघालं।।

गोड गुलाबी थंडीत, मला सपानं पडलं।

अन थंड गारठ्यान, अंगी रोमांच फुललं।।

तुला भेटण्यास आले सख्या, सकाळी सकाळी।

गुलाबी थंडीत आले, राजा पहाटेच्या वेळी।।२।।


साखर झोपेत कोणी माझ्या, कानी हितगुज केलं।

डाळींबाचा दान तुझ्या कोणी, तुझ्या व्हटावं पेरलं।।

गोऱ्या गालावर तुझ्या खळी, कशी नाजूक हासली।

अन केसातली बट तुझ्या, गालावर का आली।।

हाच इशारा तुझा मला,आज सकाळी सकाळी।

गुलाबी थंडीत आलो राणी, पहाटेच्या वेळी।।३।।


कवी-राजेश साबळे,ओतूरकर

उल्हासनगर (ठाण) मोबा-९००४६७४२६३



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance